बंद

    इतिहास

    जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचा भूखंड १६,४३५.६० चौ. मीटर इतका आहे. पूर्वी जिल्हा न्यायालय, ठाणे हे पेशवाई वाडयात होते. जानेवारी १९९० मध्ये श्री. जे. आय. हितेन हे जिल्हा न्यायाधीश म्हणून कार्यरत होते.

    सन १९६८-६९ मध्ये जिल्हा न्यायालयाची सध्याची इमारत बांधण्यात आली. २००२ मध्ये विस्तारीत इमारत आहेण २००९ मध्ये याच भूखंडावर फॅमिली कोर्ट व फास्ट ट्रॅक कोर्टाची इमारत बांधण्यात आली.

    न्यायालयाच्या परिसरात जिल्हा व सत्र न्यायालय, जलदगती न्यायालये, कौटुंबिक न्यायालय, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, सहकार न्यायालय या विभागांची न्यायालये तसेच कार्यालये कार्यरत आहेत.